या अपघातात नवरदेवाचे वडील (Dilip Dinkar Tayade) दिलीप दिनकर तायडे (वय-50, रा.आंदलवाडी, ता.रावेर) तसेच नवरदेवाची काकू (Jotsna Gokul Tayade) ज्योत्सना गोकुळ तायडे (वय - 45, रा. आंदलवाडी, ता.रावेर) हे ठार झाले तर अॅॅपेतील नामे ज्योती बुधाकर तायडे, ललिता संतोष तायडे बुधाकर भास्कर तायडे यांच्यासह अन्य जखमी झाले. दरम्यान, रावेर तालुक्यातील आंदलवाडी (Andalwadi Taluka Raver) येथे रविवारी रात्री दोन्ही मयतांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.[ads id="ads2"]
नियंत्रण सुटल्याने रीक्षा उलटली
प्राप्त माहितीनुसार, रावेर तालुक्यातील आंदलवाडी (Andalwadi Taluka Raver) येथील शुभम दिलीप तायडे याच्या लग्न बस्त्यासाठी रविवारी भुसावळ (Bhusawal) येथे अॅपे रिक्षा(Ape Riksha) नंबर (एम.एच.19- बी.यु.5156) ने निघाली होती मात्र भोरटेक फाट्याजवळ (Bhortek Fata) खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अॅॅॅॅपे (Appe) उलटल्याने या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर अन्य तीन जण जखमी झाले. अपघातामध्ये नवरदेवाचे वडील दिलीप दिनकर तायडे (वय 50) तसेच नवरदेवाची काकू ज्योत्सना गोकुळ तायडे (वय 45) यांचा मृत्यू झाला तर ज्योती बुधाकर तायडे, ललिता संतोष तायडे बुधाकर भास्कर तायडे हे जखमी झाले. त्यांचेवर उपचार सुरू आहे.
पोलिस प्रशासनाने घेतली घटनास्थळी धाव
सदर अपघाताची माहिती मिळताच फैजपूर पोलिस (Faijpur Police) ठाण्यातील कर्मचारी, पाडळसे पोलिस पाटील (Police Patil, Padalse) सुरेश खैरनार, पाडळसे सरपंच ज्ञानेश्वर तायडे, भोरटेक येथील सामाजिक कार्यकर्ते स्वामी कोळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपस्थितांच्या सहाय्याने उपचारार्थ भुसावळात हलवले.