ऊस तोडणी मजुराची थेरोळा शिवारात आत्महत्या

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

कडूनिंबाच्या झाडावर गळफास घेत संपविले स्वत:ला, कारण गुलदस्त्यात

  ऊस तोडणीसाठी आलेल्या वृद्ध मजुराने गळफास लावून स्वतःची जीवनयात्रा संपविल्याची घटना मंगळवारी दुपारी थेरोळा शिवारात घडली. गोकुळ प्रभू पवार (वय ५५, रा.उमरा, ता, मुक्ताईनगर) असे या मजुराचे नाव आहे.[ads id="ads1"] 

थे  रोळा शिवारात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा ऊस तोडणी करण्यासाठी मजुरांच्या टोळ्या आसपासच्या गावांसह इतर जिल्ह्यातूनसुद्धा दाखल झाल्या आहेत. जवळच असलेल्या उमरा या गावातून गोकुळ प्रभू पवार हा ५५ वर्षीय इसमसुद्धा आपले कुटुंब घेऊन याठिकाणी दाखल झाला होता. मंगळवारी गोकुळ हा कुन्हा येथून दुपारी बारा ते एकच्या दरम्यान आला आणि त्याने भाऊराव बेलदार यांच्या शेताच्या शेजारी वनहद्दीत असलेल्या टेकडीवर एका कडूनिंबाच्या झाडावर दोराच्या सहाय्याने फाशी घेऊन आत्महत्या केली.[ads id="ads2"] 

ही घटना समजताच थेरोळा येथील पोलीस पाटील समाधान भोंबे यांनी कु-हा पोलीस चौकीला खबर दिली. हवालदार श्रावण जवरे, संजय लाटे, अरुण लोहार हे घटनास्थळी गेले आणि त्यांनी मृतदेह खाली उतरविला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मुक्ताईनगर येथे पाठविण्यात आला. मयताचा मुलगा अनिल गोकुळ पवार याने दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!