रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)
रावेर शहरातील सरदार जी जी स्पोर्ट्स क्लब व मित्रपरिवार यांच्यातर्फे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मॅटवरील भव्य खुल्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्त सरदार जी जी हायस्कूलच्या क्रीडांगणावर सर्व खेळाडूंचा ऑक्शन समारंभ संपन्न झाला. [ads id="ads1"]
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश जी मुजुमदार हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन नितीन जी बर्डे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले बल देवता हनुमान व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली. [ads id="ads2"]
खेळाडूंच्या नोंदणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून नोंदणी कार्यक्रम सुरू होता या रावेर प्रीमियर लीग मध्ये एकूण 64 खेळाडूंना सहभाग देण्यात येणार होता. तसेच शहरातील व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर संदीप पाटील, श्रीराम पाटील, शीतल पाटील, राजेंद्र चौधरी, अॅड सुरज चौधरी, यशवंत दलाल, महेंद्र पाटील, अतुल विंचुरकर या आठही संघ प्रायोजक यांनी प्रत्येकी आठ अशा एकूण आठ संघांवर लिलाव पद्धतीने खेळाडू विकत घेतले आहेत. या आठही संघांच्या मॅचेस या दिनांक 10 एप्रिल पासून सुरू होणार असून दररोज दोन अशाप्रकारे या मॅचेस असणार आहेत तर दिनांक 24 एप्रिल या दिवशी या या स्पर्धेचा अंतिम सामना असेल.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष कन्हैयालाल शेठ अग्रवाल, , प्रमोद वाणी, डॉ दत्तप्रसाद दलाल, शैलेंद्र देशमुख,प्रदिप मिसर सर व शाळेचे मुख्याध्यापक शिरिष वाणी सर भास्कर महाजन, दिपक नगरे, चैतन्य महाजन हे होते. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आनंद महागडे राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशन जळगाव, हरीश शेळके राष्ट्रीय खेळाडू, अनिल कोळी राष्ट्रीय पंच प्रशिक्षक जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशन जळगाव, सुनील राणे दीपक जी वाढले संचालक क्रीडा प्रबोधिनी संघ एरंडोल अरुण गावंडे हे होते. तर कार्यक्रमाचे सुत्र संचालन युवराज माळी यांनी केले तर आभार अजय महाजन सर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ क्रीडाशिक्षक जे के पाटील, व्ही व्ही पाटील, देवेंद्र महाजन, किरण महाजन, कल्पेश रावेरकर, प्रतिक खराले, मोहन महाजन, जयेश बिरपन, ललिर महाजन प्रतीक नाईक जितेंद्र वानखेडे, स्वप्नील चौधरी, दिपक जाधव, प्रशांत, तुषार महाजन,हेमंत देव व सरदार जी जी स्पोर्ट्स क्लब मित्र परिवाराचे सदस्य परिश्रम घेत आहेत.