फैजपूर प्रतिनिधी (समाधान गाढे) फैजपूर (Faijpur Tal Raver) येथे यात्रा (Yatra) पाहण्यासाठी आलेल्या मुलीला भावासह नातेवाईकांसमोरूनच दोघा संशयीतांनी दुचाकीवरून पळवून नेल्याची घटना काल रविवारी घडली. या प्रकरणी फैजपूर येथील पोलिस (Faijpur Police) ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला.[ads id="ads1"]
भर दुपारच्या घटनेने खळबळ यावल तालुक्यातील (Yawal Taluka) एका गावात राहणारी मुलगी ही कुटुंबियांसह वास्तव्याला असून फैजपूर (Faijpur)येथे खंडोबा यात्रोत्सवानिमित्त मुलगी, तिचा भाऊ आणि नातेवाईक असे तिघे जण रविवार रोजी दिनांक 20 मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आले होते.[ads id="ads2"]
दरम्यान दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पीडीत मुलीसह तिचा भाऊ आणि नातेवाईक असे जिघे घरी जात असताना संशयीत आरोपी जीवन अशोक भालेराव (भालोद, ता. यावल) व आकाश संजय भागेश्वर (सावदा, ता.रावेर) हे दुचाकीवर आले व त्यांनी मुलीच्या भावाला व नातेवाईकाला धक्का देत मुलीला सोडले नाही तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत पीडीत मुलीला दुचाकीवरून पळवून नेले.