प्रत्येक व्यक्ती जन्माने वेगळी, विशेष व दुर्मिळ आहे- प्राचार्य डॉ जे बी अंजने
ऐनपूर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभाग जळगाव व सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, विद्यार्थी विकास विभाग, ऐनपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी मुले - मुली व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा 10 व्याख्याने अंतर्गत व्यक्तिमत्व विकास व जातीय सलोखा या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.[ads id="ads1"]
या व्याख्यानाचे पहिले प्रमुख व्याख्याते प्रा. डॉ. इरफान बशीर शेख एच जे थीम कॉलेज जळगाव यांनी जातीय सलोखा या विषयावर एकमेकांच्या जाती बद्दलचा आदर राखावा, एकमेकांमध्ये सद्भावना ठेवावी, एकमेकांचा द्वेष करू नये,तसेच व्यक्तिमत्त्वाच्या वेगवेगळ्या टिप्स व उपाय सांगितले. [ads id="ads2"]
इतरांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकणे, हसून बोलणे, इतरांशी नम्रपणे व काळजीपूर्वक बोलणे, पुस्तके वाचन करणे, रात्री झोपण्यापूर्वी वाचन करणे, पेहराव, नीटनेटके स्वच्छ कपडे घालने, संयम पाळणे व मन शांत ठेवणे गरजेचे आहे. इतरांच्या यशाचे कौतुक करणे, वागणे, आदराने बोलणे, सकारात्मक आणि व्यापक विचाराने बोलणे, ओरडून, किंचाळून न बोलणे, नम्रपणे बोलणे गरजेचे आहे असे सांगितले. तर कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख व्याख्याते प्रा.डॉ. राजू सुरेश गवारे एच जे थीम कॉलेज जळगाव यांनी व्यक्तिमत्व विकास या विषयावर हिंदी काव्या मधील ओळींचा आधार घेऊन अपूर्ण ज्ञान असणारी व्यक्ती खूप काही मुद्देसूद सांगत नसते पण ज्ञानाने अभ्यासपूर्णपूर्ण असलेली व्यक्ती मुद्देसूद विचार मांडत असते.
एखादी व्यक्ती चिडचिडी असेल तर तिच्याशी शांतपणे सुसंवाद साधला पाहिजे जेणेकरून ती व्यक्ती शांतपणाने आपल्याला प्रतिसाद देईल ज्या व्यक्तीला स्वतःला पुढे जायचे असेल, स्वतःचा विकास करायचा असेल तर तीने प्रथम स्वतःला सकारात्मक बनविले पाहिजे नंतरच ती इतरांना बदलू शकते. स्टीफन हॉकिंग यांच्या क्लारिटी ऑफ थिंकींग ठेवले पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या कार्यामध्ये अडथळा निर्माण झाला नसेल तर ती व्यक्ती योग्य दिशेने जात नाही असे समजावे जर एखाद्या व्यक्तीला एखादे काम करताना अडथळा निर्माण झाला असेल तर ती व्यक्ती योग्य दिशेने काम करत आहे असे समजले पाहिजे.
प्रत्येक विद्यार्थ्याने रोज १० मिनिटे इतर विषयात देणे आवश्यक आहे. व्यक्ती जोपर्यंत चुका करत नाही तोपर्यंत तो आयुष्यात शिकत नाही असे त्यांनी सांगितले. या व्याख्यानाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे बी अंजने यांनी सकारात्मक विचार ठेवणारी विद्यार्थी असतील तर ती नक्कीच प्रगती करू शकतात. कुटुंबातील व्यवहारिक उदाहरण देऊन नकारात्मक व सकारात्मक विचार कसा आपल्या जीवनात परीणाम करत असतात असे त्यांच्या मनोगतामध्ये सांगितले. या व्याख्यानाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक व परिचय प्रा. डॉ. विनोद रामटेके यांनी केले.
या व्याख्यानासाठी ११७ विद्यार्थी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. या व्याख्यानाच्या आयोजनासाठी प्राध्यापक डॉ. आर. व्ही. भोळे प्रा. डॉ. एस. एस. साळुंके, प्रा. डॉ. जयंता नेहेते, प्रा. अक्षय महाजन, प्रा. ज्ञानेश्वर कोळी, प्रा. प्रदीप तायडे प्राध्यापक मुळे व प्रा. डॉ. विनोद रामटेके यांनी परिश्रम घेतले शेवटी मान्यवरांचे आभार प्रा. प्रदीप तायडे यांनी मानले.

