यावल (सुरेश पाटील) यावल-रावेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून शेती पिकांचे नुकसान करणे,शेती साहित्याची चोरी होणे,गाई,म्हशी,बैल इत्यादी पशुधन चोरीस जाणे घटना वाढत असल्याने शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.[ads id="ads1"]
यासंदर्भात ठोस निर्णय आणि कार्यवाही होण्यासाठी यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात शेतकऱ्यांची आणि पोलीस प्रशासनाची एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीत समाज सेवक डॉ.कुंदन फेगडे यांनी डिवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे,पोलीस निरीक्षक यांच्या समक्ष आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.[ads id="ads2"]
मंगळवार दि.15 मार्च रोजी यावल कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी व पोलीस प्रशासनाच्या वतीने एक संयुक्त बैठक घेण्यात आली.
या वेळी शेतकऱ्यांच्या शेती नुकसानी बद्दल शेतकऱ्यांनी व डॉ.कुंदन फेगडे यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.रावेर - यावल तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान/नासाडी करणे,उभे पिक कापून नेणे,पीक कापून अथवा आग लावून जाळून टाकणे, शेतात गुरे चारणे,विद्युत पंप, विद्युत केबल्स चोरी या त्रासामुळे आणि शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.दोन दिवसापूर्वी येथील किशोर राणे यांचे शेतात बकऱ्या चराईस मनाई केल्यावरून राणे यांना बेदम मारहाण करत दुसरे दिवशी सुमारे 6 लाखाचे 2 हजार केळीचे घड कापून नुकसान केले.तसेच तालुक्यातील चितोडा येथील दिनेश कुरकुरे यांच्या शेतातील हरभऱ्याच्या पेटवून देवून ५० हजार रुपयांचे नुकसान केले.या घटनामुळे यावल तालुक्यातील शेतकऱ्यामधे मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे,शेतकऱ्याच्या उभ्या पिकासह शेतीतील शेती साहित्याच्या चोऱ्या तसेच रात्रभर मोकाट गुरे शेतात चराईस सोडले जात असल्याने चहु बाजूने शेतक-यांची कोंडी करत नुकसान केले जात असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया बैठकीत शेतकऱ्यांनी व डॉ.कुंदन फेगडे यांनी व्यक्त केल्या.या दरम्यान मोकाट गुरे मालक तसेच शेत पिकाचे नुकसान करणारे व शेत साहित्याची चोरी करणारे आढळून आल्यास त्यांचेवर कडक स्वरुपाची कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी विनंती डॉ. फेगडे यांनी पोलीस प्रशासनास केली.या प्रसंगी उपविभागीय पोलिस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील,डॉ.कुंदन फेगडे,शहर अध्यक्ष डॉ.निलेश गडे,धिरज महाजन,हेमराज फेगडे,किशोर राणे,प्रमोद नेमाडे,कृष्णाजी पाटील,डिगंबर सावकारे, अट्रावलचे राजेन्द्र महाजन यांनी व्यथा मांडल्या.बैठकीस शहरासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

