न्यायालयात याप्रकरणी कामकाज झाले असता सत्र न्यायालयाचे न्या.डी.एन.खडसे यांनी ९ साक्षीदार तपासल्यानंतर आरोपीला दोषी ठरविले. अत्याचार प्रकरणी आरोपीला नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून पीडितेला ६ हजार रुपये दंडाची रक्कम देण्याचे आदेश सुनावण्यात आले आहे.[ads id="ads2"]
पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका ८ वर्षीय गतिमंद चिमुकलीला घरात बोलावून दि.२४ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी १०.३० ते ११.३० वाजेच्या आरोपी रमेश मंगा कळस्कर याने दरवाजा आतुन बंद करुन अतिप्रसंग केला होता. याप्रकरणी पाळधी दुरक्षेत्र येथे आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने पोलीसांनी गु.र. क. २३७ / २०२०, भा.द.वि. कलम ३७६(२) (जे) (एल). ३४२ आणि बा.लै.अ.प्र.अधिनियम २०१२ चे कलम ४, ६, ८, १२ नुसार तक्रार नोंदविली. खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयाचे सत्र न्यायाधीश डी. एन. खडसे सो. यांच्या न्यायालयासमोर झाली. त्यात सहा. शासकिय अभियोक्ता निलेश चौधरी यांनी एकूण ९ साक्षीदार तपासले. यात फिर्यादी, पिडीतेचे वडील, पिडीता स्वतः पंच साक्षीदारांची साक्ष तपासी अंमलदार व डॉक्टर यांची साक्षी महत्वपूर्ण ठरली.
खटल्याकामी पिडीता ही ८ वर्षाची मतीमंद असल्याने तिची साक्ष नोंदविण्यासाठी गुजराती मुक बधीर विद्यालय, धरणगांव येथील नियुक्तीचे विशेष शिक्षक यांच्या मदतीने सांकेतिक भोषेद्वारे, इशा-याद्वारे, खाणाखुणा करुन नोंदविण्यात आलेली आहे. तसेच सदर खटल्याकामी घटना घडल्यानंतर पिडीता ही घाबरलेल्या अवस्थेत रडत आरोपीच्या घरातून बाहेर पडतांना पाहीलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. तसेच सदर कामातील तपासी अधिकारी यांनी योग्य प्रकारे काम केल्यामुळे तसेच सरकारपक्षातर्फे करण्यात आलेला प्रभावी युक्तीवाद मे. न्यायालयाने ग्राहय धरत आरोपीस भा.दं.वि. कलम ३७६ (२) (जे) (एल) व ३४१ आणि बा.लै.अ.प्र. अधिनियम २०१२ चे कलम ३अ व ५ अन्वये दोषी धरुन शिक्षा ठोठावली.
खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता निलेश द. चौधरी यांनी साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून प्रभावी युक्तिवाद केला. तसेच ८ वर्ष वयाच्या लहानग्या मतीमंद मुलीसोबत केलेले कृत्य हे समाजात नात्यांच्या व माणुसकीच्या छबीला काळीमा फासणारे आहे असाही युक्तिवाद केला. न्यायालयासमोर आलेले पुरावे व प्रभावी युक्तिवाद यामुळे न्यायालयाने आरोपी यास दोषी धरले आहे. याकामी पैरवी अधिकारी देविदास कोळी तसेच केस वॉच विलास पाटील यांनी सहकार्य केले


