यावल ता.प्रतिनिधी(आवेद तडवी) दि.२७ मार्च २०२२ रोजी वि.का.स.सोसायटी कोळवद येथे १३ सभासद जागांसाठी निवडणूक लढवली गेली त्यात प्रगती पॅनल चे ११ सदस्य निवडून आले.पॅनल प्रमुख श्री.अनिल प्रल्हाद पाटील यांच्या साथीने हा विजय घडून आला.[ads id="ads2"]
निवडून आलेल्या सर्व सदस्यांचे सत्कार आमदार श्री.शिरीष दादा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास कोळवद गावाचे सरपंच याकूब तडवी,श्री.शेखर सोपान पाटील गट नेता पंचायत समिती यावल, मेजर बापू अढायगे सर्व ग्रामस्थ तसेच माजी संचालक मंडळ उपस्थित होते.


