रावेर ते निंभोरा (Raver To Nimbhora) रेल्वे स्थानकांदरम्यान अजंदे शिवारात (Ajande Shivar) असलेल्या चिंचफाटा मार्गाच्या रेल्वे बोगद्यालगत अप रेल्वे मार्गावरील खांब क्रमांक ४७५ / २५ जवळ एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला.[ads id="ads2"]
त्याचे दोन्ही हात-पाय धावत्या रेल्वेगाडी चेंगरून कापले गेले आहेत. मानही धडावेगळी होऊन कवटी फुटून चेंगरली गेली. अंगावरील कपडे रेल्वेखाली घसरल्याने या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवणे मोठे जिकिरीचे ठरले आहे. त्याच्या डोक्याच्या त्वचेला पांढरे केसांचा पुंजका आहे.
हेही वाचा :- मित्रांसोबत गोवा फिरण्यासाठी गेलेल्या भुसावळातील तरुणाचा समुद्राच्या लाटेत बुडाल्याने मृत्यू
हेही वाचा :- जळगाव जिल्ह्यात "या" तारखेपर्यंत (1) (3) कलम लागू
रावेर रेल्वेस्थानक (Raver Railway Station) अधीक्षकांनी दिलेल्या खबरीवरून रावेर पोलिसात (Raver Police) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे (Raver PI Kailas Nagare) व तपास अधिकारी पो.हे.को.अर्जुन सोनवणे यांनी केले आहे.



