स्वातंत्र्याचा अमृतपथ अभियान कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात भाषण करतांना जयसिंग वाघ , मंचावर उपस्थित प्राचार्य डॉ गायकवाड , प्राचार्य डॉ वले , खलील देशमुख |
जळगाव : आज भारतात मूळ मुद्दे बाजूला ढेऊन वेगवेगळ्या कारणाने सामाजिक विद्वेष पसरवून तरुणांना रस्त्यावर उतरविले जात आहे पण हे असेच चालू राहिले तर देशात यादवी माजेल , तेंव्हा स्वातंत्र्याच्या चळवळीतून दाखवून दिलेले शांतता , अहिंसा , सर्वधर्म समभाव , सत्य ही तत्वे मांडली गेली पाहिजे असे स्पष्ट मत प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी व्यक्त केले.[ads id="ads1"]
स्वातंत्र्याचा अमृतपथ अभियान कार्यकर्ता शिबीर दिनांक 20 रोजी इकरा कॉलेज , जळगाव येथे घेण्यात आले असता मार्गदर्शनपर भाषणात वाघ बोलत होते .
आपल्या भाषणात जयसिंग वाघ यांनी पुढं असे सांगितले की ज्यांना स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास माहीत नाही ते त्या चळवळीची खिल्ली उडवीत आहेत, देशद्रोहाचे रूपांतर देशभक्तीत केले जात आहे , संविधानाची पायमल्ली केली जात आहे हे सर्व प्रकार एका यादवी कडे नेणारे आहे असे वाघ यांनी विविध उदाहरणाने स्पष्ट केले. [ads id="ads2"]
प्रसिद्ध विचारवंत प्रा शेखर सोनालकर यांनी स्वातंत्र चळवळीचा इतिहास सविस्तरपणे मांडून सर्वच जाती धर्म महिला यात एकत्र येऊन लढले , जातीय ऐक्य , धार्मिक ऐक्य , सामाजिक सुधारणा , राजकीय सुधारणा त्यांनी घडवून आणल्या मात्र त्या तत्वांना आता हरताळ फासला जात आहे या बद्दल त्यांनी खंत व्यक्त केली , अत्यंत अभ्यासपूर्ण व मुद्देसूद मुद्दे मांडून त्यांनी शिबिराची भूमिका विशद केली .
खलील देशमुख यांनी स्वातंत्र्य आंदोलनात मुस्लीम समाजाचे योगदान या विषयी सविस्तर मांडणी केली मुस्लीम समाज नेहमीच या लढ्यात अग्रेसर राहिला आहे पण ते समोर येत नाही , मुस्लिम समाजाने आता या देशात राहणेच गैर आहे असा एकप्रकारे प्रचार केला जातो हे बंद करणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले .
स्वागताध्यक्ष करीम सालार यांनी जे या आंदोलनात नव्हते ते आज प्रखर राष्ट्रवादाच्या गप्पा मारत आहेत असे सांगितले. तेजोमई भालेराव , प्रभात चौधरी , गोपाळ नेवे यांचीही या शिबिरात अभ्यासपूर्ण भाषणे झाली , शिबिराच्या अध्यक्षस्थानी प्रा शेखर सोनालकर होते , सूत्रसंचालन शैला सावंत यांनी तर आभार प्रदर्शन वासंती दिघे यांनी केले .
कार्यक्रमास विविध सामाजिक , सांस्कृतिक चळवळीतील कार्यकर्ते , प्राध्यापक , विद्यार्थी मोठया संख्येने हजर होते स्वातंत्र्याचा अमृतपथ अभियान ऑगस्ट 2023 पर्यंत सुरू ठेवण्यात येईल असे वासंती दिघे यांनी शेवटी जाहीर केले