मुलीना स्वतःचे संरक्षण स्वतः करता यावे,अभ्यासेतर उपक्रमात मुलीनी मोकळेपणाने सहभागी व्हावे, त्यांना आपण सबळ आहोत,स्वावलंबी आहोत असे वाटावे या उद्देशाने जुडो कराटे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यांना रावेर येथील श्री गणेश जलंकार , वासिम तडवी यांनी प्रशिक्षण दिले.[ads id="ads2"]
प्रस्तुत शिबिराचे उदघाट्न उपप्राचार्य डॉं.एस.बी.पाटील यांच्या शुभहस्ते १४ मार्च २०२२ रोजी करण्यात आले. आपल्या उदघटनपर भाषणात ते म्हणाले विद्यार्थिनीनि या शिबिराचा लाभ घेऊन स्वसंरक्षण करावे. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉं.जे.बी.अंजने हे होते त्यांनी शिबिरास शुभेच्छा देऊन विद्यार्थिनीनि प्रस्तुत शिबिराचा लाभ घ्यावा, जुडो कराटेचे कौशल्य आत्मसात करून स्वसंरक्षण करावे असे आवाहन केले, महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉं. नीता एस.वाणी यांनी प्रास्ताविकात शिबिराचे महत्व व उद्देश कथन केला. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ रामटेके यांनी जास्तीत जास्त विद्यार्थिनीनि प्रस्तुत शिबिराचा लाभ घ्यावा असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉं.नीता एस.वाणी यांनी केले तर आभार डॉं. व्ही.एन. रामटेके यांनी मानले.
प्रस्तुत शिबिर दिनांक १४/०३/२०२२ ते २३/०३/२०२२ असे आठ दिवस सकाळी ७ ते ९ या वेळात आयोजित करण्यात आले होते श्री.गणेश जलंकार आणि वासिम तडवी,प्रदीप जलंकार यांनी स्वसंरक्षणाच्या विविध क्लुप्त्या बिद्यार्थिनीना दाखविल्या महिला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉं. नीता एस.वाणी यांनी विद्यार्थीनिना प्रोत्साहित करून विशेष असे सहकार्य त्यांना केले. ५० विद्यार्थिनीनि शिबिराचा लाभ घेतला. २३ मार्च २०२२ रोजी या शिबिराचा समारोप करण्यात आला.
चौधरी भाग्यश्री, चरहाटे, गायत्री, तावडे,रुचिता ,चौधरी तेजस्विनी पाटील, वैष्णवी टोंगळे या विद्यार्थिनी आपल्या मनोगतात म्हणाल्या जुडो कराटे शिबिरामुळे आमच्यातील न्यूनगंड बाजूला होऊन आत्मविश्वास निर्माण झाला आहे आता आम्ही आमचे संरक्षण स्वतः करू शकू. समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉं.जे.बी.अंजने यांनी भूषविले आपल्या समारोपीय भाषणात ते म्हणाले वर्तमानकालीन सोशल मिडीयाच्या काळात मुलींसाठी अशा शिबिराची गरज आहे. मात्र शिबिराचा उपयोग वेळप्रसंग पाहून करा,विनाकारण कुणाला त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या. समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन डॉ. नीता एस.वाणी यांनी केले तर आभार डॉं.व्ही.एन.रामटेके यांनी मानले.



