पोलिस सांगून वृद्धास लुटणाऱ्या त्या दोघांची कोठडीत रवानगी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल (समाधान गाढे) : तालुक्यातील पाडळसे येथील एका ६८ वर्षीय वृध्दास रस्ता अडवून लुटणाऱ्या ‘त्या’ दोघ संशयीतांना तीन दिवसाची २ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या दोघा संशयीतांना २१ फेब्रुवारी रोजी शिरपूर (Shirpur) येथून ताब्यात घेण्यात आले होते व दोघांची ओळख परेड असल्याने पोलिस कस्टडी राखून ठेवत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तेव्हा ओळख परेड देखील पुर्ण झाली आहे.[ads id="ads1"] 

पाडळसे ता. यावल (Padalse Taluka Yawal) येथील दिलीप पुरुषोत्तम बऱ्हाटे वय ६८ हे दिनांक १३ जानेवारी रोजी सकाळी दुचाकी क्रमांक एम. एच. ०३ ए. पी. १६०८ व्दारे यावल येथे होते दरम्यान शहराजवळील घोडे पिर बाबा दर्गाच्या पुढे सकाळी त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर दोन जण आले व त्यांनी बऱ्हाटे यांना थांबवले व आपण जळगाव येथील पोलीस आहोत. तुमच्या कडे गांजा असल्याचा संशय असल्याचे सांगत त्यांनी बऱ्हाटे यांच्या दुचाकीवर त्यांची अंग झडती घेतली.[ads id="ads2"] 

  व त्यांच्या हातातील ४० हजार रूपये किंमतीची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढुन फरार झाले होते. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर अशा प्रकारे शिरपूर पोलिसात दोन संशयीतांना पोलिसांनी अटक केली व यावलचा गुन्ह्याचा त्याच्यावर संशय असल्याने दिनांक २१ फेब्रुवारी रोजी यावल पोलिसांनी शिरपूर येथुन जावेद अली नौशाद अली वय ४३ व जफर हुसेन उर्फ इज्जत हुसेन वय ३९ दोघे राहणार शिवाजीनगर रेल्वे पोलीस कॉलनी परळी, जिल्हा बीड यांना ताब्यात घेतले होते व ओळख परेड करीता पोलिस कोठडी राखुन ठेवत दोघांना न्यायलयीन कोठडी पाठवण्यात आले होते. तेव्हा ओळख परेड नंतर रविवारी या दोघ संशयीतांना येथील न्यायालयात न्यायधिश व्ही.एस.डामरे यांच्या समोर हजर केले असता दोघांना तीन दिवसाची २ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास पोलिस निरिक्षक सुधीर पाटील, उपनिरिक्षक विनोद खांडबहाले करीत आहे.

भुसावळ उपकारागृहात ओळख परेड

या दोघ संशयीतांची यावलचे सहदंडाधिकारी निवासी नायब तहसिलदार आर.के.पवार यांच्या समक्ष भुसावळ उपकारागृहात फिर्यादी समोर शुक्रवारी ओळख परेड घेण्यात आली होती

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!