ऐनपूर महाविद्यालयाचे रासेयो शिबिर उत्साहात संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


ऐनपूर: येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर दि. ०५/०३/२०२२ ते ११/०३/२०२२ या कालवधीत दत्तक वस्ती बलवाडी ता. रावेर येथे पार पडले.[ads id="ads1"] 

 महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे या निवासी शिबिरात वैचारिक प्रबोधन व श्रमसंस्कार करण्यात आले. जि. प. शाळा बलवाडी परिसरात, गावात साफ सफाई करण्यात आली. यासोबतच विद्यार्थ्यांनी शौचालय व नळ कनेक्शन चा सर्व्हे केला. गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली त्यावेळी कार्यक्रम अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती, बेटी बचाव बेटी पढाव या विषयावर पथनाट्य सादर केले.[ads id="ads2"] 

   तसेच मा. संचालक प्रा. डॉ. सचिन नांद्रे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांनी शिबिराला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत डॉ. आशुतोष वर्डीकर, रावेर विभागीय रासेयो समन्वयक, डॉ. नितिन बडगुजर जळगाव विभागीय रासेयो समन्वयक हे उपस्थित होते. यावेळी मा. संचालक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वेगवेगळ्या शिबिरांमध्ये विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोदवा असे त्यांनी सांगितले. 

समारोपाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ऐनपुर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. भागवत विश्वनाथ पाटील यांनी भुषविले. बलवाडी गावाचे सरपंच मा. श्री. विनायक नारायण पाटील यांच्या शुभहस्ते समारोप करण्यात आला. यावेळी श्री. बा. ना. पाटील माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष श्री. गोपाळ विठ्ठल पाटील, चेअरमन श्री. विनोद जगन्नाथ पाटील, ऐनपुर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा. श्री. संजय वामन पाटील, संचालक श्री. हरी भिका पाटील, श्री. एन. व्ही. पाटील, श्री. प्रल्हाद मधुकर पाटील, श्री. कैलास कडू पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने, ग्रामसेवक श्री. प्रकाश तायडे, जि. प. मराठी शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. महेश गोपाळ पाटील, जि. प. मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रभाकर पाटील, श्री. ज्ञानेश्वर पाटील, श्री. अरविंद पाटील, श्री. गोविंदा महाजन, किशोर पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला निकिता पाटील, सानिका महाजन व कृष्णाली महाजन या विद्यार्थींनी स्वागत गीत सादर केले. नंतर कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. जयंत नेहेते यांनी शिबीराचा अहवाल सादर केला. समारोपा प्रसंगी विद्यार्थींनीं मधून भारती पाटील, श्रद्धा तायडे, चैताली सुतार, साक्षी कोळी विद्यार्थ्यांमधून देवेंद्र जैन, अविनाश दांडगे, साहिल शेख, ललित पाटील व प्रज्वल पाटील यांनी मनोगत व्यक्त करून कॅम्प संपल्यामुळे वेगळे होण्याची खंत व्यक्त करत विविध वक्त्यांचे मार्गदर्शन मिळाल्याने समाधान व्यक्त केले. नंतर श्री. अरविंद पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री. विनोद पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी हे शिबीर म्हणजे संस्कारांची शाळा आहे असे मत मांडले. 

अध्यक्षीय समारोपात मा. भागवत पाटील यांनी रासेयो स्वयंसेवकांमध्ये झालेल्या सकारात्मक बदलाचे कौतुक केले. सुत्रसंचलन रासेयो स्वयंसेवक अल्ताब पटेल ह्याने तर आभार रेखा तायडे हिने मानले. सदर शिबिराच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनखाली कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. जयंत नेहेते, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दिपक पाटील,महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. रेखा पाटील, श्री. गोपाळ महाजन, रासेयो स्वयंसेवक, नितीन महाजन यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!