धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर
धरणगाव : येथील लहान माळी वाडा परिसरातील समस्त माळी समाज पंच मंडळ व समाज बांधव यांच्या मंगल कार्यालयाच्या नियोजित जागेचे भूमिपूजन राज्याचे मंत्री तथा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, सर्व समाज बांधव व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. [ads id="ads1"]
राष्ट्रपिता, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९५ व्या, जन्मदिनाचे औचित्य साधुन माळी समाज मंगल कार्यालयाच्या नियोजित जागेचे भूमिपूजन करून मंगल कार्यालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. तत्पूर्वी, आपल्या कर्मातच देव पाहणारे, संत शिरोमणी सावता महाराज, कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, शिक्षणाची खरी देवी सावित्रीमाई फुले, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला ना.गुलाबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य समरसता मंच आर एन महाजन, सिनेट सदस्य डी. आर.पाटील, शिवसेना सहसंपर्क प्रमूख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, उषाताई वाघ, पुष्पाताई महाजन, अंजली विसावे, उद्योगपती जिवनसिंह बयस, नपा गटनेते विनय (पप्पू) भावे, विठोबा महाजन, रामकृष्ण महाजन, शिवाजीराव देशमुख, उद्योजक भगवान पाटील, मोहन महाजन, चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, ब्रम्हकुमारी नीता दीदी आदी मान्यवरांनी माल्यार्पण करून दीपप्रज्वलन केले.[ads id="ads2"]
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात समाजाचे जेष्ठ सदस्य तथा, जेष्ठ पत्रकार कडूजी महाजन यांनी सांगितले की, मागील कित्येक वर्षांपासून पै - पै गोळा करून समाज बांधवांनी जो पैसा उभा केला त्या पैशांची योग्य प्रकारे गुंतवणूक करून खऱ्या अर्थाने चीज करण्यात आले. आजपर्यंत ज्या सर्व लोकांनी समाजाचे कार्य अतिशय प्रामाणिकपणे केले त्यांच्या श्रमाचे हे फलित आहे. समाजकार्य करतांना व्यक्तिगत हित बाजूला ठेवून सर्वस्व झोकून दिले तर हे सर्व घडत असतं. आजपावेतो ज्या ज्या संचालकांनी त्यांचे पूर्ण आयुष्य खर्ची घालून समाजाला उभारी देण्याचं कार्य केलं. परंतु ती सर्व दिग्गज मंडळी आज या जगात नाहीयेत त्यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करुन ५७०० स्क्वे.फु. च्या जागेवर भव्य मंगल कार्यालय बांधले जाणार, असा संकल्प व निर्धार सर्व समाज बांधवांनी व्यक्त केला. याप्रसंगी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव त्याचप्रमाणे मोठा माळी वाडा, लहान माळी वाडा समाजाध्यक्ष, कुणबी समाज, तेली समाज, मराठे समाजाचे अध्यक्ष व पंचमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या ऐतिहासिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित पाटील यांनी तर आभार राजेंद्र मांगो महाजन यांनी मानले.


