रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)
सावदा येथील रेस्ट हाऊसला 1 वा. मुस्लिम, कोळी, तडवी, बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय माजी खासदार बाळासाहेब तथा प्रकाश जी आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडी या पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला. [ads id="ads1"]
जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे यांची काम करण्याची पद्धत गोरगरीब जनतेसाठी रात्री-बेरात्री धावुन येणे. तसेच फैजपूर येथील मधुकर साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे व कामगारांचे गेल्या काही महिन्यांपासून पगार न होणे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे यांचे तसेच रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांनी वंचित बहुजन आघाडी पक्ष वाढवण्यासाठी गावोगावी खेड्या पाड्या वरती बैठका घेऊन सर्व समाजातील लोकांना वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे की गेल्या वर्षी covid19 काळामध्ये वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून गोरगरीब जनतेला अन्नपुरवठा केला व सर्वतोपरी मदत केली आजही गोरगरीब जनतेच्या प्रश्नांसाठी श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर रात्रंदिवस झटत आहे. [ads id="ads2"]
या देशात एकच नेता आहे आणि ते बाळासाहेब प्रकाश आंबेडकर आहे म्हणून सर्व बहुजन समाजातील तळागाळातील जनतेने वंचित बहुजन आघाडी या पक्षात प्रवेश केला पाहिजे व एक हाती सत्ता कशी येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांचे हात मजबूत करून या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बाळासाहेब आंबेडकर हेच झाले पाहिजे. आजचा हा प्रवेश सोहळा यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे.
वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची नावे याकुबदादा, प्रशांत तायडे, आबीद कुरेशी, चंद्रकांत चोपडे, जाकीर तडवी, सचिन बोडे, बिस्मील्ला शाहा, याच्यासह असंख्य कार्यकत्यानी वंचित बहुजन आघाडी पक्षात जाहीर प्रवेश केला त्यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष विनोदभाऊ सोनवणे,जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग, रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे, रावेर तालुका उपाध्यक्ष सलीम शहा, भुसावळ शहर सचिव मॅजेर देवदत्त मकासरे,यांनी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी प्रकाश तायडे, अजय तायडे, बन्सी लहासे, संघरत्न शिरतुरे, नितीन तायडे, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


.jpg)