
ऐनपुर प्रतिनिधी (विजय एस अवसरमल)
आज 19 एप्रिल 2022 रोजी विटवे तालुका रावेर येथे प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत, शाळा पूर्वतयारी मेळावा आयोजीत करण्यात आला याप्रसंगी मा. साहेबराव वानखेड़े यांच्या हस्ते मेळाव्याचे उदघाटन गुलाबी फित कापून करण्यात आले.[ads id="ads1"]
प्रमुख उपस्थिती म्हणुन ऐनपुर केंद्राचे केंद्र प्रमुख श्री.भूषण चौधरी होते तर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. संतोष कोळी व शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री. बाळु मनुरे यांच्या हस्ते दिपप्रज्जलित करुण सरस्वतीमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुण सदर मेळाव्याची सुरवात करण्यात आली.[ads id="ads2"]
यावेळी आंगनवाड़ी मधून जी मुले इयत्ता 1ली मध्ये प्रवेश घेणार आहे त्या विद्यार्थी विद्यार्थिनींचे शालेय व्यवस्थापन समिती , मुख्याध्यापक, शिक्षक,यांचे कडून स्वागत करण्यात आले हया मेळव्यात श्री.शिवदास महाजन सर व श्री सतीश चौधरीसर यांनी शाळापूर्व तयारी कशी करायची या विषयासंदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले याप्रसंगी सूत्रसंचलन शाळेचे मुख्यध्यापक श्री. किशोर चव्हाण सर तर आभार विपिन पाटील सर यांनी केले सदर कार्यक्रमाला विद्यार्थी विद्यार्थिनी पालक महिला पुरुष आंगनवाड़ी सेविका गावकरी मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित होते.

