दिराकडून वहिनीवर चाकूहल्ला ; रावेर तालुक्यातील आभोडा गावातील घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


जखमी महिलेवर रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचार

दोन भावांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वहिनीवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना रावेर तालुक्यातील आभोडा येथे घडली. याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात दिराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला[ads id="ads1"] .

रावेर तालुक्यातील आभोडा येथे वामन जगन वाघ हे पत्नी सविता वाघ यांच्यासह वास्तव्याला आहे. रविवार, 10 एप्रिल रोजी वामन जगन वाघ यांचे भाऊ बळीराम जगन वाघ यांचे कौटुंबिक कारणावरून घरात भांडण सुरू होते. पती व दिराचे भांडण पाहून सविता वाघ यांनी भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केली असता दिर बळीराम जगन वाघ याने तीक्ष्ण चाकूने वार करून सविता वाघ यांना जखमी केले व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. [ads id="ads2"] 

  यात सविता वाघ या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रावेर रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. 

हेही वाचा :- २३ वर्षीय आदीवासी तरूणीचा सर्पदंशाने दुदैवी मृत्यू 

सविता वाघ यांच्या फिर्यादीवरून बळीराम जगन वाघ याच्या विरोधात रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहे.