या बैठकीचे प्रमुख पाहुणे वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे जिल्हा महासचिव दिनेश भाऊ ईखारे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात वंचित बहुजन आघाडीचे जळगाव जिल्हा प्रभारी एडवोकेट रविकांत वाघ यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या.[ads id="ads2"]
वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या सर्व निवडणुका बाळासाहेब प्रकाशजी आंबेडकर यांच्या आदेशा नुसार स्वबळावर लढवणार असून कार्यकर्त्यांनी आतापासून वंचित बहुजन आघाडी चा प्रचार आणि प्रसार सुरू केला पाहिजे अन्यथा जो कार्यकर्ता यापुढे काम करणार नाही त्याला पदावरून कमी करून पदमुक्त केले जाईल याची कार्यकर्त्यांनी नोंद घ्यायची आहे व आता पासून वंचित बहुजन आघाडी चा प्रचाराला सुरुवात करायची आहे.आणि पक्षाचे जास्तीत जास्त सभासद करायचे आहे सभासद मोहीम गावागावांत वार्डा वार्डातून राबवायची आहे.म्हणून ही आजची बैठक आयोजित केली होती. असे ते अध्यक्षीय भाषणामध्ये ते म्हणाले
वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांनी रावेर तालुक्याचा आढावा सादर करून संपूर्ण रावेर तालुक्याची माहिती जिल्हा प्रभारी रविकांत वाघ यांच्यासमोर मांडली. या बैठकीला देवदत्त मकासरे, नितीन अवसरमल, गौतम अटकाळे, नरेंद्र करवले, दौलत अढांगळे, चंद्रसिंग बारेला, कंदरसिंग बारेला, अर्जुन वाघ, इमरान शेख, प्रतीक दामोदरे, दादाराव इंगळे, मनोज सवर्णे, तरुण गाढे, प्रकार तायडे, सचिन तायडे, अशोक शिरतुरे, वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी रावेर तालुका अध्यक्षा गायत्री कोचुरे, सुलभा मुसळे, बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते महिला या बैठकीला उपस्थित होत्या. या बैठकीचे सूत्रसंचालन राजेंद्र अवसरमल यांनी केले आणि आभार सलीम शहा, यासिम शहा यांनी मानले.


.jpg)