तलवार बाळगणाऱ्या दोन संशयितांना सावदा पोलिसांनी तलवारीसह अटक केली. या प्रकणारी सावदा पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.अधिक माहिती अशी की, सावदा पो.स्टे.हद्दीतील थोरगव्हाण गावास जवळ देशी दारू अडया जवळ रायपूर रस्त्याने दुचाकी (क्र. MH 10, AF 1679 ) यावरून आकाश विष्णू सपकाळे वय 22 व अनिल मनोहर तायडे वय 21 रा.रायपूर ता. रावेर हे जात असताना त्यांना सावदा पोलिसानी संशयावरून अडवले, विचारपूस व तपासणी केली असता त्यांचे जवळ 2 तलवारी आढळून आल्याने पो.ना. अक्षय हिरोळे यांचे फिर्यादी वरून आर्म अँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सावदा पोलीस करीत आहे.[ads id="ads2"]
सदर कामगिरी स.पो.नी. देवीदास इंगोले, पी.एस.आय. समाधान गायकवाड, पो.हे.कॉ.संजय चौधरी, स.पो. माहेमुद शहा, पो.हे.कॉ.खोडपे, उमेश पाटील, यशवंत टहाकळे यांनी केली.



