सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे “स्पर्धा परीक्षांचे विश्व” या विषयावरील व्याख्यान संपन्न झाले. आजच्या तरुणांमध्ये स्पर्धा परीक्षां विषयीची जाणीव होणे गरजेचे असून जास्तीस्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षां विषयीची माहिती मिळवून त्याप्रमाणे तयारी करणे आवश्यक आहे. [ads id="ads1"]
ह्या हेतूने महाविद्यालयाने स्पर्धापरीक्षा मार्गदर्शनासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रातील तरुणांचा कल वाढावा ह्या हेतूने स्पर्धा परीक्षां मार्गदर्शन कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने होते. तसेच कार्यक्रमास तज्ञ मार्गदर्शक म्हणून जळगाव येथील प्रशासक प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक प्रा. उमाकांत महाजन होते. [ads id="ads2"]
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संदीप साळुंके यांनी केले त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचा परिचय डॉ. जयंत नेहेते यांनी करून दिला. प्रा. उमाकांत महाजन यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात स्पर्धा परीक्षेचे स्वरूप, स्पर्धा परीक्षांचे प्रकार, एम.पी.एस.सी, यूपीएससी तसेच इतर परीक्षांच्या माध्यमातून आपण आपले ध्येय निश्चित करू शकतो असे सांगितले. स्पर्धा परीक्षेतून निवड होवून आपण सेवाभाव तसेच आपल्या पदाचा वापर हा लोककल्याणासाठी झाला पाहिजे असे प्रतिपादन केले. आपल्या सखोल व्याख्यानात स्पर्धा परीक्षेची तयारी, निवडीचे निकष, इत्यादी विषयी मार्गदर्शन केले. यानंतर अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. जे. बी. अंजने यांनी स्पर्धा परीक्षा का आवश्यक आहे या परीक्षांची पार्श्वभूमी काय आहे आणि प्रत्येक क्षेत्र हे स्पर्धेचे आहे. स्पर्धेच्या युगात आपल्याला टिकायचे असेल तर आजपासूनच आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करणे गरजेचे आहे असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते एकूण १०५ व्यक्तींनी कार्यक्रमास सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. पी. अंजने , डॉ. सतीश वैष्णव, डॉ. जयंत नेहेते. डॉ. संदीप साळुंके. डॉ. पी. आर गवळी, प्रा. साईनाथ उम्रीवाड, डॉ. सचिन झोपे, श्री. कुत्रू अवसरमल, श्री. हर्शल पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास प्रा. अक्षय महाजन , प्रा. प्रदीप तायडे, प्रा. ज्ञानेश्वर कोळी, प्रा. नरेंद्र मुळे, प्रा. महेंद्र सोनावणे उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमास उपस्थितांचे आभार डॉ. पी. आर. गवळी यांनी मानले व अध्यक्ष यांच्या अनुमतीने कार्यक्रमाची सांगता झाली.