यावल (सुरेश पाटील) शेतातील विहिरीजवळील टेक्समो कंपनीच्या10हॉसपॉवर क्षमतेच्या मोनोब्लॉक असेंबल केलेल्या अंदाजे 24हजार रुपये किमतीच्या पाण्याच्या2इलेक्ट्रीक मोटारी कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून आज दि.4रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला.[ads id="ads1"]
यावल येथील तेजस सतीश यावलकर वय 40 यांनी यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की यावल शिवारातील शेत गट नंबर 1470 शेताजवळील विहिरीवर पाणी उपसा करण्यासाठी टेक्समो कंपनीची 10 हॉसपॉवर क्षमतेची मोनोब्लॉक असेंबल केलेल्या पाण्याच्या2 इलेक्ट्रीक मोटारी अंदाजे 24 हजार रुपये किमतीच्या हिरव्या रंगाची मोनोब्लॉक असलेल्या [ads id="ads2"] दोन इलेक्ट्रीक मोटारी कोणीतरी अज्ञात इसमाने संमती वाचून चोरून नेल्या या कारणावरून यावल पोलीस स्टेशनला भाग5 गु.र.नं.206/2022भादवी 379 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. घटनास्थळी फैजपुर डीवायएसपी कुनाल सोनवणे,यावल पोलीस निरीक्षक आशित कांबळे यांनी भेट देऊन पुढील चौकशी आणि कार्यवाहीचे आदेश दिले.पुढील तपास हे.कॉ.नितीन चव्हाण हे करीत आहे.


