रावेर प्रतिनिधी (समाधान गाढे) रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक येथे आयुष्यमान भारत वर्धिनि उपकेंद्रात डॉक्टर नसल्याने व वारंवार दवाखाना बंद असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे तसेच वारंवार साथीचे रोग डेंगू मलेरिया ताप सर्दी खोकला पोटदुखी व इतर आजार उद्भवत असतात तसेच गर्भवती स्त्रीयांसाठी व लहान मुलांसाठी गरीब व गरजू लोकांना तसेच गावातील सर्व नागरीकांसाठी गोळ्या औषधी व लसीकरण डोस मोफत दिल्या जातात.[ads id="ads2"]
परंतु या दवाखान्यात येणार्या लोकांना मात्र बऱ्याच वेळेस दवाखाना बंद पाहुन परत जावे लागत असल्याने मोठ्या प्रमाणात जनतेतून व गावातून नाराजगी व्यक्त केली जात आहे .सर्वसामान्य जनतेचे आरोग्यबाबत चा प्रश्न निर्माण झाला आहे . म्हणुन आरोग्य विभागाणे विवरे गावात काहीतरी उपाय योजना करण्यात यावी . तसेच गावातील नागरिकांच्या उपचारासाठी दवाखान्यामध्ये कायमस्वरूपी डॉक्टर असण्याची स्थानिक नागरिकांची मागणी होत आहे.



.jpg)