भालोद येथील ३५ वर्षीय बेपत्ता तरूणाचा मृतदेह आढळला

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

भालोद येथील ३५ वर्षीय बेपत्ता तरूणाचा मृतदेह आढळला

यावल तालुक्यातील भालोद (Bhalod)  येथील एका ३५ वर्षीय इसमाने शेत विहिरीत उडी घेवुन आत्महत्या केली आहे. ही घटना सोमवारी उघडकीस आली असुन हा इसम रविवारी सकाळ पासुन बेपत्ता होता. तर सोमवारी त्याचा मृतदेह अट्रावल रस्त्यावरील शेत विहिरीत आढळून आला या प्रकरणी फैजपूर पोलिसात (Faijpur Police) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.[ads id="ads1"] 

यावल तालुक्यातील भालोद (Bhalod Taluka Yawal)  येथील रहिवासी सतीष रामकृष्ण इंगळे वय ३५ हा रविवारी सकाळी घरातुन निघाला होता व सायंकाळी घरी परत आलाचं नाही तेव्हा नातेवाईक व कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो मिळून आला नाही तर सोमवारी सकाळी अट्रावल रस्त्यावरील पी. टी. चोपडे यांच्या शेत विहिरीत सतिष इंगळे याच्या मृतदेह शेतमजुरांना दिसुन आला व तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली.[ads id="ads2"] 

   तेव्हा फैजपूरचे सहायक पोलिस निरिक्षक (Faijpur API) सिध्देश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार हेमंत सांगळे, पोलिस नाईक महेश वंजारी, किरण चाटे हे पथक घटनासथळी दाखल झाले व विहिरीतु सिध्दार्थ भालेराव यांच्या मदतीने विहिरीतुन मृतदेह काढत यावल ग्रामिण रूग्णालयात (Yawal Rural Hospital) आणण्यात आला.

    वैद्यकिय अधिकारी डॉ. बी.बी. बारेला यांनी शवविच्छेदन करीत मृतदेह नातेवाईकांना सोपवला मयत या प्रकरणी फैजपूर पोलिसात सुरज इंगळे यांनी दिलेल्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलिस नाईक महेश वंजारी करीत आहे मयत याच्या पश्चात म्हतारी आई, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे त्याने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!