(सुवर्ण दिप वृत्तसेवा) फैजपुर , ता. यावल येथील धनाजी नाना महाविद्यालयाचा विद्यार्थी कु. निरज देविदास शिरनामे , रा. खिर्डी बु. ता. रावेर याने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ , जळगाव द्वारे एप्रिल - २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत एम.ए. इंग्रजी विषयात विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.[ads id="ads1"]
या यशाबद्दल निरज ला विद्यापीठाने २४ मे रोजी आयोजित केलेल्या ३० व्या दिक्षांत समारोहात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती महामहिम भगतसिंग कोश्यारी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत कुलगुरू प्रो. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते कै. प्रा. अरुण निंबाजी माळी सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.[ads id="ads2"]
सदरील वाटचालीत त्यास फैजपुर महाविद्यालयाचे चेअरमन आ. शिरीष चौधरी , प्राचार्य पी. आर चौधरी , इंग्रजी विभागप्रमुख प्रा. जगदिश पाटील , प्रा. राजेंद्र राजपुत आणि आदींचे सहकार्य लाभले.आकाश इरिगेशन चे संचालक श्री विनोद वाघोदे,आकाश वाघोदे,यांनी देखील सत्कार केला.


