बऱ्याचदा ऐकतो किवा पाहतो की नवऱ्याने छळले म्हणून बायकोने पोलिसांत धाव घेतली. पण बुलडाणा जिल्ह्यात याउलट एक प्रकार घडला आहे. पोलीस तर सोडा पतीने थेट बायकोच्या विरोधात उपोषण सुरु केले आहे.[ads id="ads1"]
नवरा बायकोचे भांडण आणि नवरा बायकोच्या विरोधात थेट उपोषणाला बसण्याचा हा प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरातला आहे. शहरातील राजनगर येथे राहणाऱ्या नवऱ्याने पत्नीने घटस्फोट न घेता दुसरे लग्न केले म्हणून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी गेले. मात्र, त्यांना पोलिसांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने उपोषणाचे अस्त्र बाहेर काढले आहे.[ads id="ads2"]
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात लवकरात लवकर पत्नीवर गुन्हा दाखल करावा आणि कारवाई करावी, अशी मागणी पतीने केली आहे. 26 मे पासून नांदुरा येथील तहसील कार्यालयासमोर आपला तंबू ठोकला आहे. त्यामुळे पोलीस आता नेमक काय पाऊल उचलतात याकडे त्रासलेल्या पतीच लक्ष लागून आहे. तसेच असा प्रकार पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वदूर याच विषयाची चर्चा सुरु आहे.


