ग्रामीण भागातील शाषकीय कार्यलयात माहितीचा अधिकार २००५ फलक गायब

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


मनवेल ता.यावल (गोकुळ कोळी) : शासनाच्या निर्देशानुसार शासनाच्या अधीन असलेल्या प्रत्येक शाषकीय कार्यलयात माहितीचा अधिकार कायदा २००५ बाबत जनगागृती साठी प्रथम अपील अधिकारी , यांचा नावाचा फलक लावणे बंधनकारक असून याकडे ग्रामीण भागातील तलाठी कार्यलय, ग्रामपंचायत कार्यलय, जि.प.शाळांचे दुर्लक्ष दिसून येत आहे.[ads id="ads1"] 

माहितीचा आधिकार कायदा २००५ कायदा नुसार प्रत्येक नागरीकांला शाषकीय माहितीचा अधिकार कायदा अंतर्गत माहिती मागण्यांचा अधिकार आहे.त्यानुसार जनमाहिती अधिकारी त्याचे नाव व पद , प्रथम अपील अधिकारी नाव व पद असलेला फलक शाषकीय कार्यलयाच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे सदर फलक लावण्याची तसदी संबंधित अधिकारी घेत नसल्याने सदर कायद्याच्या फज्जा उडवित आहे.[ads id="ads2"] 

माहितीचा अधिकार कायदा २००५ नुसार कोणत्याही व्यक्ती कुठल्याही शाषकीय कार्यलयात माहीती मागवू शकतो आजचा काळात या कायदाच्या उपयोग मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे भ्रष्ट अधिकारी यांचा कारभार उघड होत असून काही कर्मचारी नको ती झनझट म्हणून जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असतात या कायद्याची अंबलबजावणी साठी शासनाकडुन लाखो रुपये खर्च होतात मात्र अधिकारी जूमानत नसल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.

मनवेल येथील जि.प.प्राथमिक शाळेत याबाबत जनमाहिती अधिकारी व प्रथम अपील अधिकारी यांचे नाव व पद असलेला फलक लावण्यात आलेला नाही.

सामान्य नागरीकांला सदर कायदा द्वारे माहीती देण्यासाठी नको ती झंझट म्हणून फलक लावण्याची तसदी घेतली जात नाही कुणी माहीती मागीतली की आली कीटकीट असे बोलले जात असल्याने माहीतीचा अधिकार कायदा २००५ फलक लावण्याकडे टाळाटाळ होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!