या अपघातात चालक बहादरपुर (मध्यप्रदेश) येथील राहिवाशी चालक तरुण प्रेमचंद महाजन वय ३५ यांचे जागीच निधन झाले अपघाताची माहिती मिळताच धीरज पाटील विजय पाटील नकुल पाटील माजी प्रभारी सरपंच रजनीकांत पाटील प्रविण तायडे संग्राम कोळी पाडुरंग कोळी यांनी मदत कार्य केले व फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. [ads id="ads2"]
घटनेचा पंचनामा व चालकास बाहेर काढण्याचे काम फैजपूर सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, पीएसआय मकसुद शेख, पो.पा.सुरेश खैरनार, उमेश सानप , विकास सोनवणे , देविदास सूरदास , गोकुळ तायडे, किरण चाटे योगेश दुसाने यांनी वाहतुक सुरळीत केली चालकावर यावल ग्रामिण रुग्णालयात शवविक्ष्षण केले पाडळसे बामणोद रस्तावरील वळणावर काटेरी झुडपे वाढल्याने वारंवार अपघात होत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने पाडळसे बामणोद रस्त्यालगत काटेरी झुडपे तात्काळ काढून टाकावे अशी मागणी होत आहे.


