दिनांक १६ मे २२ सोमवार रोजी संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास अजय बारेला व बबलू केशव बारेला राहणार बोरावल गेट यावल हे मोटरसायकल क्रमांक एम एच १९ एक्स ५९०८ वरून घरी येत असताना हिंगोना ते सांगवी दरम्यान अज्ञात ट्रक चालकाने या मोटरसायकलला जबर धडक देऊन पळून गेला तर मोटरसायकल वरील दोघे अजय बारेला व बबलू बारेला हे जबर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला हाता पायाला जबर दुखापती झालेले आहे.[ads id="ads2"]
हिंगोना येथील रहिवासी आरिफ तडवी या तरुणांनी धाडस करून संबंधित जखमींना यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले त्यांच्यावर प्राथमिक उपचार यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला, परिचारक जॉन्सन सोरटे यांनी प्राथमिक उपचार करून रात्री उशिरा सरकारी दवाखान्यात जळगाव येथे पुढील उपचाराकरता वर्ग केले सदर जखमी दोघे आदिवासी समाजाचे गरीब मजूर वर्ग असून ते पाल तालुका रावेर येथील नातेवाईकांना भेटून घरी येत होते अपघाताची माहिती मिळताच बोरावल गेट कडील जखमींचे सर्व नातेवाईक दवाखान्यात येऊन गर्दी केली.
108 नॉटरिचेबल
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे 108 नंबरची गाडी अशा अपघातग्रस्त ठिकाणाहून जखमींना व व्यक्तींना पोहोचवण्यासाठी तात्काळ अवेलेबल होत असते मात्र 108 ला फोन लावून नही फोन उचलले जात नाहीत येथील भारतीय जनता पक्षाचे तरुण कार्यकर्ते व्यंकटेश बारी यांनी स्वतः दोन-तीन वेळा 108 ला फोन लावला मात्र उशिरापर्यंत गाडी उपलब्ध न झाल्याने जखमींच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला


