यावल (सुरेश पाटील) यावल तहसील कार्यालयात आपल्या शासकीय सेवेच्या प्रति कर्तव्यनिष्ठ कार्यतत्पर सर्वसामान्यांच्या कार्यासाठी प्रशासकीय पातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी सेवाभावी वृत्तीने हसतमुखाने सदैव अग्रस्थानी राहुन आपुलकीची वागणूक देणारे निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार हे आपल्या 36 वर्षाच्या प्रर्दीघ आणि यशस्वी शासकीय सेवेतुन आज दि.31मे2022रोजी सेवानिवृत्त होत आहे.[ads id="ads1"]
यावल तहसील कार्यालयात कार्यरत असलेले निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार मुळ राहणारे आभोडे खु॥ तालुका रावेर यांचे प्राथमिक शिक्षण पाल आणी सरदार जी.जी.हायस्कुल रावेर व माध्यमिक शिक्षण जळगाव येथे नुतन मराठा कॉलेज व वसंतराव नाईक कॉलेज औरंगाबाद येथे झाले.दि.1/2/86 वर्षात त्यांची तलाठी म्हणुन पाचोरा येथून शासकीय सेवेचा शुभारंभ केला,त्यानंतर त्यांनी तलाठी म्हणुन 1989 ते1995पर्यंत खिरोदा तालुका रावेर,1995ते 1997या वर्षात सावदा तालुका रावेर,1997ते 2001निंबोल ता.रावेर,2001ते2002 मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी व 2003ते 2005पर्यंत सतत 5 वर्ष त्यांनी रावेर शहर तलाठी पदावर शासकीय सेवा बजावली.[ads id="ads2"]
याच कार्यकाळात त्यांना विजयकुमार गावीत जिल्ह्याचे हे पालकमंत्री असतांना त्यांच्या हस्ते आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, यानंतर ते 2008 ते 2011या कालावधीत त्यांनी फैजपुर शहर तालुका यावल येथे तलाठी पदाचे कार्य सांभाळले,पुनश्च त्यांनी 2012 या वर्षात ऐनपुर तालुका रावेर येथे सेवा बजावली, 2012 याच वर्षात त्यांना मंडळ अधिकारी या पदावर पदोन्नती मिळाल्याने त्यांनी 2012 ते 13या काळात नाडगाव तालुका मुक्ताईनगर येथे सेवा बजावली , 2013 ते 2017या काळात त्यांनी खानापुर तालुका रावेर येथे सेवाकार्य केले.भुसावळ येथे 2018 पर्यत पदोन्नतीवर त्यांनी तालुका करमणुककर अधिकारी म्हणुन सेवेत कार्य केले.यावल येथे श्री व्यास महाराज यांच्या तपोभुमीवर व मनुमातेच्या कुशीत पदोन्नतीवर त्यांनी निवासी नायब तहसीलदार या पदावर दिनांक 2019 ते 31/5/2022पर्यंत त्यांनी 4 वर्ष उत्कृष्ठ अशी प्रशासकीय सेवा बजावली असुन,शासकीय सेवापुर्ती नंतरचे आपले पुढील आयुष्य आपण आपल्या जन्मभुमीत असलेल्या आभोडे गावात शेती व कुटुंबा सोबत घालविणार असल्याचे त्यांनी सांगीतले.2020ते2021या दोन वर्षाच्या कोरोना संसर्गाच्या अतिशय धोकादायक काळात नागरीकांची सेवा करणारे एक उत्कृष्ठ सेवाभावी अधिकारी म्हणुन आर.के.पवार यांनी लक्ष वेधणारे उल्लेखनिय कार्य करून नांवलौकीक मिळवले.अशाप्रकारे कर्तव्यनिष्ठ असलेली नायब तहसीलदार दि.31 मे2022 रोजी महसूल सेवेतून सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवानिवृत्त सोडल्यामुळे कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


