चुंचाळेसह परिसराला मान्सून आगमनापूर्वीचा पहिला वादळासह पावसाचा तडाखा ; केळी पिकाचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल (सुरेश पाटील) आज मंगळवार दि.31मे2022 रोजी सायंकाळी मान्सून आगमनापूर्वीचा पहिला वादळी व अवकाळी पावसाचा तडाखा चुंचाळे सह परिसराला बसला यात वरुणराजाच्या तडाख्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयाच्या केळी बागा उध्वस्त झाल्या वादळादरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील सकल भागात पाणी वाहून निघाले.तर या वादळामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली त्याच प्रमाणे कापणीवर आलेल्या आशाबाई नेमिदास वाणी, संजुसिंग राजपुत,संजय नेवे, यांच्या शेतात केळी पिकांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.अनेक ठिकाणी तरी उभी केळी आडवी पडलेली आहे.[ads id="ads1"] 

          याबाबत सविस्तर असे की दि 31रोजी चुंचाळेसह परिसरातील गावांमध्ये सायंकाळी 6 वाजेपासून वादळास सुरुवात झाली तर जवळपास अर्धा ते पाऊण तास वादळ सुरु होते यादरम्यान खूप जोराने सोसाट्याचा वारा सुरू होता. वाऱ्याने गावातील व परिसरातील झाडे अक्षरश: हेलकावे खात होती.वाऱ्याचा वेग एवढा मोठा होता की काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली.वादळा दरम्यान सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.[ads id="ads2"] 

  या वादळामुळे परिसरातील शेतामधील केळी पिकांचेही नुकसान खुप मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे.बऱ्याच ठिकाणी कापणीवर आलेली केळी चे झाडे अक्षरशा खाली जमिनीवर पडली. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कडक उन्हापासून शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील केळी पिकास मेहनत घेऊन जीवाचे रान करून वाचवले मात्र वादळामुळे ही केळी जमीनदोस्त झालेली आहे. दरम्यान चुंचाळेसह परिसरात जवळपास अर्धा तो पाऊण तास मुसळधार पडलेल्या पावसाने रस्त्यावरून अक्षरशःपाणी वाहून निघाले तर मुख्य चौकातही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते.या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झालेला असल्याचे जाणवत आहे मात्र अचानक झालेल्या वादळ व अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले त्यामुळे आता शासन याबाबत काय कार्यवाही करते याकडे संपूर्ण यावल तालुक्याचे लक्ष वेधून आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!