भुसावल जळगाव महामार्गावर अपघातात जागीच 5 ठार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 भरधाव वेगाचा परिणाम उड्डाण पुलावर आज सकाळी घटना

साकेगाव रोडवर मोठा अपघात होणार?

यावल (सुरेश पाटील)भुसावळ जळगाव महामार्गावर नशिराबाद जवळील सिमेंट फॅक्टरीच्या उड्डाणपुलावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांमधील अपघातात 5 जण जागीच ठार झाले.घटना आज सकाळची असून अपघात एवढा भीषण होता की अपघातातील तीन जण उड्डाणपूला वरून खाली कोसळले.[ads id="ads2"]  

    जळगाव जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरूच आहे,भरधाव वेगाचा परिणाम उड्डाण पुलावर आज दि.29 बुधवार रोजी सकाळी अमावस्या कालावधीच्या सरतेशेवटी नशिराबाद जवळ एक विचित्र अपघात घडला आहे. सिमेंट फॅक्टरीच्या समोर रेल्वे पुलावर जळगाव कडून भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या दोन मालवाहू वाहनांवर भुसावळ करून येणारा भरधाव ट्रक धडकल्याने चौघे जागीच ठार झाले तर एकाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. [ads id="ads1"]  

 अपघात इतका भयंकर होता की, मालवाहू वाहनातील नागरिक उड्डाण पुलावरून खाली कोसळले तर ट्रक उड्डाणपुलाच्या सुरक्षा भिंतीवर चढलेला दिसून आला.

जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच असून दररोज कुठे ना कुठे अपघातात कुणाला तरी जीव गमवावा लागतो आहे.भरधाव वेगात आणि विरुद्ध दिशेने तसेच वाहतुकीचे कोणतेही नियम न पाळणाऱ्या येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे संबंधित विभागाचे हित संबंध असल्याने अपघात होत आहेत. 

     जळगावकडून आज दि.29 बुधवार रोजी सकाळी बकऱ्या घेऊन मालवाहू पीकअप व्हॅन क्र.एम.एच.43.एडी1051 व एमएच.43.बीबी.0050 हे भुसावळच्या दिशेने जात होता. सिमेंट फॅक्टरी ते डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय जवळ रेल्वे उड्डाणपुलावर वळणावर समोरून येत असलेल्या ट्रक क्र. एमपी.09.एजी.9521ने त्यांना जोरदार धडक दिली

अपघात इतका भयंकर होता की चौघांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकच्या धडकेत तीन जण उड्डाणपुलावरून थेट खाली कोसळले.दोन्ही मालवाहू चक्काचूर झाल्या असून एक मालवाहूची ट्रॉली ट्रकला चिकटली होती.मयत आणि दोन्ही जखमींना तात्काळ डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले.उपचार सुरू असताना एकाचा मृत्यू झाल्याचे समजते.

         मोठा अपघात होणार–

         भुसावळ कडून साकेगाव कडे येताना भुसावल जवळ उड्डाणपुलाजवळुन साकेगाव कडे जाताना गौण खनिजाची डंपर ट्रॅक्टर इत्यादी जड वाहतूक वाहने साकेगाव कडे विरुद्ध दिशेने सुसाट वेगाने सर्रासपणे रात्रंदिवस वाहतूक करीत असतात ही गौण खनिजाची वाहने भुसावल जवळील रुग्णालयाच्या दिशेने न जाता विरुद्ध दिशेने साकेगाव कडे दररोज वाहतूक करीत आहेत याकडे भुसावळ येथील पोलिसांचे हप्ते बाजीमुळे आणि इतर संबंधामुळे दुर्लक्ष होत असल्याने या रोडवर सुद्धा फार मोठा अपघात होऊन जीवित आणि होणार असल्याचे संपूर्ण भुसावळ विभागात बोलले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!