ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
खिर्डी येथील अभिषेक भास्कर पाटील माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 98.91 टक्के लागला असून प्रथम क्रमांक श्रुती प्रवीण महाजन 94% द्वितीय क्रमांक ऋतूज प्रवीण धुंदले 93 20 टक्के तर तृतीय क्रमांक सानिका योगेश महाजन 92.60 टक्के गुण मिळवून यशस्वी झाले.[ads id="ads2"]
शाळेतील एकूण 92 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 91 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील उपाध्यक्ष विठ्ठल पाटील सचिव अरुण पाटील चेअरमन नीरज पाटील सर्व संचालक मंडळ शाळेचे मुख्याध्यापक पी एस चौधरी सर पर्यवेक्षिका सौ कीर्ती महाजन मॅडम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.


