रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे राष्ट्रवादी वर्धापनदिन साजरा...

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 23व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रावेर येथील माजी आमदार अरुण दादा पाटील यांच्या संपर्कात कार्यालयात सकाळी 10-10 ला झेंडा वंदन करून राष्ट्रगीत गायन केले. [ads id="ads1"] 

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच प्रगत आणि अग्रेसर महाराष्ट्राचे ध्येय नजरेसमोर ठेवून चालणारा पक्ष आहे. आपल्या पक्षाचा २३ वा वर्धापन दिन साजरा करताना तळागाळातील जनतेसाठी, समाजातील प्रत्येक घटकासाठी कटिबद्ध राहण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार करूया असा निर्धार व्यक्त केला. पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी एकमेकांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.[ads id="ads2"] 

यावेळी रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नीळकंठ चौधरी, कार्याध्यक्ष विलास ताठे, महिला तालुका अध्यक्ष सौ रेखाताई चौधरी, पंचायत समितीचे सदस्य योगेश पाटील, योगिता ताई वानखेडे, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष सुनिल कोंडे, युवक तालुका अध्यक्ष सचिन पाटील, किशोर पाटील, गोपाळ, पांडुरंग पाटील, समाधान साबळे,जितू साबळे, घनश्याम पाटील,अस्लम शेख, सलीम भाई, हदयेश पाटील, अतुल पाटील,सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!