धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर
धरणगांव - धरणगाव परिसरात पर्यावरण क्षेत्रात कार्यरत जलदुत फाऊंडेशन धरणगाव ह्या संस्थेच्या सदस्यांचा अभ्यास दौरा UNDP अवॉर्ड प्राप्त गाव बारीपाडा जिल्हा धुळे येथे आज दिनांक २६ जून, २०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता.[ads id="ads2"]
बारीपाडा गावातील रहिवाश्यांनी सामुदायिक जंगल व्यवस्थापन ह्या क्षेत्रात भरीव कामगिरी करून जल, जंगल आणि जमीन वाचविण्यासाठी अनेक अभिनव उपक्रम राबवले आहेत. जलदुत फाउंडेशनच्या सदस्यांनी येथे जाऊन तेथील पर्यावरण अभ्यास केंद्र आणि बारीपाडा येथील जंगलात भेट देऊन जल, जंगल, जमीन वाचविण्यासाठी उपयोजिलेल्या विविध उपक्रमांना भेट दिली आणि त्यातील बारकावे जाणून घेतले. सदर अभ्यास दौऱ्याला चैत्राम पवार यांनी मार्गदर्शन केले.[ads id="ads1"]
या अभ्यास दौऱ्यात जलदुत फाऊंडेशनचे सदस्य प्रा.ए.आर.पाटील, एस.एस. पाटील, प्रा.डी.डी.पाटील, अंकुश पाटील , डॉ. पंकज अमृतकर, डॉ. सूचित जैन, इंजि.सुनील शाह, योगेश भाटिया, नितेश महाजन यांचा समावेश होता.


