ऐनपूर महाविद्यालयाच्या खेळाडूची विद्यापीठ ( पुरुष ) क्रिकेट संघात कु. विशाल संजीव महाजन यांची निवड

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील क्रिकेट या खेळात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रिकेट ( पुरुष ) संघात कु. महाजन विशाल संजीव एम.एस्सी द्वितीय वर्ष विद्यार्थी खेळाडूची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघात निवड करण्यात आली आहे. [ads id="ads2"]  

   सदर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जळगांव , धुळे , नंदुरबार , एरंडोल असे चार विभाग केलेले आहेत सदर आंतर विभागीय क्रिकेट सामने हे साखळी पध्दतीने खेळले जातात. जळगांव विभागाच्या तिन्ही सामन्यात कु. विशाल संजीव महाजन याने उत्कृष्ट फलंदाजी व क्षेत्ररक्षण केल्याने त्याची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघात निवड करण्यात आली आहे. आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धा 23 ते 27 जुन या दरम्यान श्री. जगदिश प्रसाद झाबरमल तिब्रेवाला विद्यापीठ वुडेला झुनझुन ( राजस्थान ) येथे होणार आहे.[ads id="ads1"]  

  सदर खेळाडूला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने, क्रीडा संचालक डॉ. सचिन एन. झोपे यांचे मार्गदर्शन लाभले कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा संघ दि. 20 जुन 2022 रोजी रवाना होणार आहे विद्यापीठाच्या संघात निवड झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन श्रीराम पाटील, अध्यक्ष भागवत भाऊ विश्वनाथ पाटील, सेक्रेटरी संजय वामन पाटील व संस्था चालक तसेच महाविद्यालयीन क्रीडा समितीचे सभासद डॉ. के. जी. कोल्हे, डॉ. पी. आर. गवळी, डॉ. आर. व्ही. भोळे, प्रा. एस. आर. इंगळे, प्रा. संदिप सांळुखे, उप प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, डॉ एस ए पाटील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी पुढील होणाऱ्या आंतर विद्यापीठाच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!