ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
इयत्ता १० वी चा आँनलाईन निकाल दिनांक १७/०६/२०२२ रोजी जाहीर करण्यात आला त्यामध्ये ऐनपुर येथील मनिषा विजय अवसरमल हिने घवघवीत यश संपादन केले आहे मनिषा विजय अवसरमल हिने ऐनपुर ता.रावेर येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय येथून इयत्ता १० वी च्या परीक्षेत ९१.२० टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे.[ads id="ads2"]
तिच्या यशात तिच्या आईवडिलां सह सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय चे मुख्याध्यापक आर जे पाटील सर उपमुख्याध्यापक सुबोध चौधरी सर पर्यवेक्षक पी आर महाजन सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले आहे तिच्या ह्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.


