मनवेल ता.यावल (गोकुळ कोळी) - साकळी येथील शिवाजी मित्र मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय शिरसाड साकळी येथे 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.. त्यानंतर विद्यार्थ्यांना ओमकार, कपालभाती, प्राणायाम, भ्रमर आसन, पद्मासन ,ताडासन याचे प्रात्यक्षिक करून दाखवले व विद्यार्थ्यांकडून ते करूनही घेतले. तसेच हाताचे,मनगटाचे व्यायाम, पायाचे व्यायाम ,मानेचे व्यायाम यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन उपशिक्षिका सौ. शुभदा दामोदर नेवे यांनी केले.[ads id="ads2"]
याप्रसंगी मुख्याध्यापिका सौ .संध्या अनंत शिंदे उपशिक्षक श्री.हुकुमचंद पाटील सर श्री. श्याम पाटील सर यांनीही योगा प्रात्यक्षिकात भाग घेतला .सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पाडण्यास सहकार्य केले.[ads id="ads1"]


