रावेर तहसील कार्यालयाबाहेर सोमवारी सकाळी १०.३० वाजेपासून धरणे आंदोलन करण्यास सुरवात झाली. यावेळी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात जोरदार घोषणाबाजी करून अग्निपथ योजना मागे घेवून, तरुणांची सैन्यात तातडीने भर्ती करावी, अग्नीपथ मुळे युवकांचे भवितव्य धोक्यात असल्याचे कॉग्रेस पक्षाचे म्हणणे आहे.[ads id="ads1"]
यावेळी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, बाजार समितीचे माजी सभापती डॉ. राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी, वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश पाटील, काँग्रेसचे अनुसूचित जाती-जमाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू सुवर्णे, आदिवासी सेलचे दीलरुबाब तडवी,महिला आघाडी तालुकाध्यक्ष मानसी पवार, गुणवंत सातव, महिला आघाडी सेवादल तालुकाध्यक्ष भाग्यश्री पाठक, भरत कुंवर, प्रकाश सूरदास, महेश तायडे, रामदास लहासे, संतोष पाटील,कांता बोरा, महिला आघाडी शहराध्यक्ष वर्षा महाजन, गफूर तडवी, विजय महाजन, राहुल पाटील, अनिल मशाने,प्रीती महाजन,कविता महाजन,रेखा महाजन,गणेश बोरनारे, राहुल महाजन, सुभाष महाजन, इस्माईल पहेलवान, दिनकर महाजन, संजय पाटील, पिंटू महाजन, गुलशेर तडवी,भारत कुंवर यांचेसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.




