यावल (सुरेश पाटील) यावल नगरपालिका कार्यक्षेत्रातील ओला व सुका घनकचरा वाहतूक करण्याचा ठेका एका ठेकेदाराला दिला असला तरी ठेकेदाराकडे असलेल्या कचरा वाहतूक करणाऱ्या काही वाहनावरील घंटा आणि रेकॉर्डिंगचा आवाज नागरिकांना येत नसल्याने घंटागाडी आली किंवा नाही याबाबत नागरिकांना समजत किंवा ऐकू येत नसल्याने नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.[ads id="ads2"]
याकडे यावल नगरपरिषद साफसफाई व स्वच्छता विभाग कर्मचाऱ्याचे दुर्लक्ष होत असून ठेकेदाराचे बिल मात्र तो कर्मचारी टक्केवारी घेऊन नियमित काढीत असल्याचे यावल शहरात बोलले जात आहे.या ठेकेदाराची कचरा वाहतूक यंत्रणेची वाहनांची मुख्याधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी व चौकशी करून त्याचे बिल अदा करू नये अशी संपूर्ण यावल शहरातून मागणी होत आहे.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल शहरातून आणि विकसित भागातून ओला व सुका कचरा वाहतूक करण्याचा ठेका एका ठेकेदाराला देण्यात आला असून कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांचा स्पीकर किंवा घंटागाडीचा आवाज,हॉर्नचा येत घरात असलेल्या नागरिकांना महिलांना ऐकू येत नसल्याने कचरा वाहतूक करणारी गाडी आली किंवा नाही समजुन येत नाही त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे,कचरा वाहतूक करणाऱ्या ठेकेदार ओला व सुका कचरा याचे वर्गिकरण करून कचरा डेपोवर नियमानुसार कचऱ्याची विल्हेवाट लावीत आहे का? कचरा डेपोवर आतापर्यंत किती टन वजना इतका कचरा संकलित झाला?आणि ठेकेदाराने आतापर्यंत किती टन ओला व सुका कचरा संकलित केला याची प्रत्यक्ष खात्री करूनच यावल नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांने ठेकेदाराला बिल अदा केले आहे का?किती टन कचरा संकलित झाल्या नुसार ठेकेदाराला बिल अदा केले याची यावल नगर परिषद मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून यावल नगरपालिकेतील साफसफाई कर्मचारी आणि ठेकेदाराने यावल नगरपरिषदेची दिशाभूल आणि शुद्ध फसवणूक केली असल्याने मागील सहा महिन्याच्या कामाची चौकशी करून ठेकेदाराला माहे जून 2022 महिन्यापासून बिल अदा करू नये अशी संपूर्ण यावल शहरातून मागणी होत आहे.


