ऐनपुर येथील डॉ कुंदन पाटील यांना डि.एन.बी.कार्डीओलोजी पदवी प्रदान

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



ऐनपुर प्रतिनिधी (विजय एस अवसरमल)

ऐनपुर येथील डॉ कुंदन पाटील यांना नुकतीच डी.एन.बी. कर्डीऑलोजी पदवी प्रदान करण्यात आली आहे.सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथील मंगलाबाई विश्वनाथ पाटील व विश्वनाथ गणू पाटील यांचे सुपुत्र डॉ कुंदन पाटील यांनी गवर्नमेंट मेडिकल कॉलेज कालीकत या केरळमधील नामवंत संस्थेतून डि.एम.कर्डीऑलोजी चे प्रशिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण केले आहे.[ads id="ads1"] 

डॉ कुंदन पाटील यांनी एम बी बी एस चे प्रशिक्षण मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये पूर्ण केले व त्यानंतर डि एन बी जनरल मेडीसिन ची पदवी मिळवली त्यांनी NEET - SS या स्पर्धा परीक्षत देशात ९२ वा क्रमांक मिळवून डी एम कर्डीओलॉजी या अभ्याक्रमासाठी प्रवेश मिळवला होता.[ads id="ads2"] 

   तसेच त्यांनी नुकतीच डी एन बी कर्डीओलॉजी ही पदवी मिळवली आहे डी एम कर्डीओलॉजी व डी एन बी कर्डीओलॉजी ह्या हृदयरोग शास्त्राच्या अत्यूच पदव्या असून एकोकोर्डियोग्रफी अँजोग्राफी अँजोप्लासटी तसेच विविध हृदयविकाराचे उपचार आणि चिकित्सा पद्धती या प्रशिक्षणाचा भाग आहे.

हेही वाचा :-   सहकार व सहाय्यक सहकार अधिकारी एसीबी च्या जाळ्यात 

अत्यंत कठीण असा हा अभ्यासक्रम पार करणारे डॉ कुंदन पाटील महाराष्ट्रातील मोजक्या डॉक्टरापैकी एक आहेत त्याबद्दल परिसरातून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!