रावेर प्रतिनिधि (विनोद कोळी) प्रहार परिवाराचे कुटुंब प्रमुख राज्याचे दबंग राज्यमंत्री मा.ना.श्री.बच्चू भाऊ कडू यांच्या कार्य पद्धतीवर फिदा होऊन तसेच उत्तर महाराष्ट्र प्रमुख मा.श्री.अनिल भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन दररोज पक्षात कार्यकर्त्यांची इनकमिंग सुरू आहे. आज रावेर नगरीचे नावाजलेल व्यक्तिमत्त्व दिवंगत गरम खून साहेब यांचे पुत्र भावी नगरसेवक श्रीमान सबदर जी पहेलवान व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.कनिसा बी यांचा प्रहार परिवारात श्री.अनिल भाऊ चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश झाला.[ads id="ads2"]
या पक्ष प्रवेशाप्रसंगी रावेर लोकसभा जिल्हाप्रमुख राजेंद्र महाजन,शेतकरी जिल्हाप्रमुख सुरेश चिंधू पाटील,युवा जिल्हाप्रमुख अविनाश पाटील,शेतकरी उप जिल्हाप्रमुख गणेश बोरसे,रावेर तालुका प्रमुख पिंटू धांडे,युवा तालुका प्रमुख योगेश निकम,अल्पसंख्याक तालुका प्रमुख वसीम शेख, तालुका प्रसिद्धी प्रमुख,विनोद कोळी. छोटू भाई व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.