Dharangaon : उखळवाडी येथील विकास सोसायटी बिनविरोध निवड

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


चेअरमन पदी सेवानिवृत्त राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक पंढरीनाथ गिरधर पाटील यांची सर्वानुमते निवड

धरणगाव प्रतिनिधी (पी.डी.पाटील सर) धरणगाव तालुक्यातील विकास सोसायटी उखळवाडी यांचे सन २०२२-२०२७ या पंचवार्षिक निवड साठी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेस सदस्य सौ भिकुबाई पाटील, सौ सुशीला पाटील, सौ मालू पाटील, सुकलाल पाटील, पंढरीनाथ पाटील, अरुण पाटील, मुरलीधर पाटील, प्रभाकर पाटील, भाईदास पाटील, किर्तीकुमार पाटील, बापूराव पाटील उपस्थित होते.[ads id="ads1"] 

            बिनविरोध चेअरमन म्हणून सेवानिवृत्त राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक पंढरीनाथ गिरधर पाटील यांची निवड करण्यात आली. तसेच व्हॉ. चेअरमन म्हणून बापूराव रावण पाटील यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्‍ही.बी.पवार यांनी कामकाज पाहिले.[ads id="ads2"] 

              याप्रसंगी सरपंच सौ. सुशिलाबाई जगन्नाथ पाटील व ग्रामसेवक जोशी व पवार आप्पा तसेच सचिव रवींद्र पाटील उपस्थित होते. सदरची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संजय पाटील, गणेश पाटील, सुरेश पाटील, नवल भालेराव, दिनकर पाटील तसेच ग्रामस्थ बंधू-भगिनी उपस्थित होते.

                याप्रसंगी नवनिर्वाचित चेअरमन, व्हा चेअरमन यांचा ग्रामपंचायत उखळवाडी तर्फे सत्कार करण्यात आला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!