ऐनपूर महाविद्यालयात सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल

ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात कुत्रु सिताराम अवसरमल नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले म्हणून सेवापूर्ती सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. [ads id="ads2"]  

  महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कुत्रु व सरला अवसरमल यांना कपडे,साडी,शाल, टोपी रुमाल व रोख रुपये १०,०००/- देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. ऐनपूर परीसर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सुध्दा कुत्रुव सरला अवसरमल यांना कपडे, साडी,शाल, टोपी, रुमाल, व भेट वस्तू देऊन अध्यक्ष भागवतभाऊ पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. [ads id="ads1"]  

  डॉ के जी कोल्हे, डॉ पी आर गवळी, गोपाळ महाजन, प्राचार्य डॉ जे बी अंजने, संस्थेचे उपाध्यक्ष रामदास महाजन यांनी त्यांच्या प्रामाणिक सेवेबाबत मनोगत व्यक्त केले. कुत्रु अवसरमल यांचे चिरंजीव राहूल अवसरमल यांनीही त्यांनी गरीबीत दिवस काढून मुलांना शिकवले.सत्कार मूर्ती कुत्रु अवसरमल यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की संस्थेने मला सेवेची संधी दिली म्हणून मी माझ्या मुला-मुलींना चांगले शिक्षण देऊ शकलो. मी प्रामाणिक सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे तरी माझ्या हातून नकळत काही चूक झाली असल्यास मला माफ करावे. यावेळी त्यांच्या अनेक नातेवाईकांनी तसेच प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी त्यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा एम के सोनवणे यांनी, प्रास्ताविक डॉ विनोद रामटेके यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ जे पी नेहेते यांनी केले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व नातेवाईक उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!