विरोधात बातमी लावण्याचा राग धरून पत्रकाराला धमकी.... नगरसेवका विरूद्ध रावेर तहसीलदार यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे निवेदन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 



ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल

अमळनेर येथील दिव्य लोकतंत्र या वेब पोर्टल चॅनल च्या संपादकाला विरोधात बातमी लावल्याचा राग धरून नगरसेवकाने धमकी दिली.[ads id="ads2"]  

सविस्तर वृत्त असे की अमळनेर येथील दिव्य लोकतंत्र या वेब पोर्टल चॅनल चे संपादक समाधान मैराळे यांनी आपल्या पोर्टल च्या माध्यमातून नगरपालिका क्षेत्रातील प्रभागातील अविकसित तथा न झालेल्या कामाचा स्थानिक नागरिकांच्या तक्रारीवरून व प्रत्यक्षदर्शी समस्यांचे अवलोकन करून नागरिकांच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वाचा फोडल्याचा राग येवून नगरसेवक संतोष पाटील उर्फ भुऱ्या अप्पा यांनी समाधान मैराळे यांना भ्रमणध्वनी द्वारा मारण्याची धमकी देऊन खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन लोकशाहीचा चौथा स्तंभ अर्थात पत्रकारितेचा गळा घोटण्याचा प्रकार केला आहे.[ads id="ads1"]  

सदर बाब ही गंभीर असल्याने राज्य शासनाने पत्रकारांना संरक्षण कवच म्हणून पत्रकार संरक्षण अधिनियम कलम४ अस्तित्वात आणला असून या कायद्यानुसार नगरसेवकावर गुन्हा दाखल करून लोकशाही वाचवावी तसे न केल्यास राज्यव्यापी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून या घटने विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याबाबत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख तथा रावेर शहर अध्यक्ष विनोद रामचंद्र कोळी यांच्या अध्यक्षतेखाली रावेर तहसिलदार उषाराणी देवगुणे मॅडम हे काही शासकीय कामानिमित्त बाहेर गेले असताना निवासी नायब तहसीलदार संजय तायडे साहेब तसेच रावेर पोलिस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक नवले साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर विनोद कोळी आकाश भालेराव प्रमोद कोंडे सभाजी पाटील तुषार कोळी योगेश कोळी विजय एस अवसरमल विजय के अवसरमल दिलीप सोनवणे राहुल जैन संजय पाटील प्रभाकर महाजन यांनी स्वाक्षरी केली आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!