रावेर (Raver) तालुक्यातील तासखेडा (Taskheda) येथील 26 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी सावदा पोलिसात (Savda Police) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अजय मनोहर कुंभार (26, तासखेडा, ता. रावेर) असे मयताचे नाव आहे. [ads id="ads2"]
अजय कुंभार यांनी गळफास घेतल्यानंतर ही बाब लक्षात येताच त्यांना अत्यवस्थ अवस्थेत जळगावच्या द्वारका रुग्णालयात (Dwarka Hospital) हलवण्यात आले होते व तेथून जिल्हा सामान्य रुग्णालयात (Civil Hospital Jalgaon) हलवण्यात आल्यानंतर उपचार सुरू असताना त्यांची 11 जुलै रोजी प्राणज्योत मालवली. तपास हवालदार श्रावण पोहेकर करीत आहेत.


