रावेर पंचायत समितीच्या (Raver Panchayat Samiti) स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय घोटाळा प्रकरणात अटक होणाऱ्याची संख्या वाढत असून रात्री अजुन दोन आरोपींना खिरोदा प्र.रावेर व खिरवड (Khirwad) येथून पोलिसांनी अटक केली आहे.[ads id="ads2"]
रावेर पंचायत समिती (Raver Panchayat Samiti) मधील वैयक्तीक शौचालय योजनेत झालेले भ्रष्ट्राचार प्रकरणी रोज नव नविन खुलासे समोर येत असून संशयित आरोपींची संख्या वाढत आहे. काल रात्री खिरोदा प्र.रावेर येथून सतीष वामनराव पाटील तर खिरवड (Khirwad) येथून महेंद्र बिसन गाढे या दोघांना ताब्यात घेत अटक करण्यात आली असून एकूण आरोपींची संख्या दहा वर पोहचली आहे.[ads id="ads1"]
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय घोटाळा प्रकरणाने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणी सोमवारी गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल (BDO Dipali Kotwal) यांची तब्बल तीन तास चौकशी करून अधिका-यांनी त्यांचा जबाब नोंदवला होता त्यानंतर सायंकाळी काही बँक अधिका-यांची देखिल चौकशी तपास अधिकारी शितलकुमार नाईक यांच्याकडून करण्यात आली होती.


