यावल शहरात मेन रोडवर आणि यावल भुसावल रोडवर टी पॉइंट पासून फैजपुर रोड आणि चोपडा रोडवर,बुरुज चौकापासून तहसील कार्यालय तसेच सातोद कडे जाणाऱ्या रस्त्यावर,बोरावल गेट परिसरात,सुदर्शन चित्रमंदिर भागात बेशिस्त प्रवासी व दुचाकी चार चाकी वाहनांच्या पार्किंगमुळे विरुद्ध दिशेने सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनधारकांमुळे, वाहतुकीमुळे तसेच भर रस्त्यावर आणि रस्त्याच्या आजूबाजूला झालेल्या अतिक्रमणामुळे यावलकरांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.[ads id="ads1"]
बऱ्याच वेळेला किरकोळ भांडण तंटे होत असतात एखाद्या वेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन जातीय सलोखा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही यामुळे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी यावलकरांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून तसेच कायदा व सुव्यवस्था,शांतता आणि जातीय सलोखा अबाधित राहणे कामी भर रस्त्यावर अनधिकृत,अतिक्रमित जागेवर व्यवसाय करणाऱ्यांचा आणि अवैध वाहतूक आणि अवैध पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांवर कडक कारवाई करावी अशी यावल शहरातून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.