फैजपूरमध्ये विश्व हिंदू परीषद व बजरंग दलाचा फैजपूरात मूक मोर्चा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


फैजपूर ता.यावल (किरण तायडे) देशभरात हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ विश्व हिंदू परीरषद व बजरंग दलाच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 24 रोजी मूक मोर्चा काढण्यात आला. मूक मोर्चाला गावातील श्रीराम मंदिरापासून खान्देशरत्न शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांच्याहस्ते प्रारंभ करण्यात आला. [ads id="ads1"] 
  मूक मोर्चा पेहेडवाडा, सराफगल्ली, मोठा हनुमान मंदिर, सुभाषचंद्र बोस चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग, हुतात्मा बापू वाणी चौक, बस स्थानक मार्गे नगरपालिका, प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला. प्रांताधिकारी यांच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे यांनी निवेदन स्वीकारले.[ads id="ads2"] 

यांची होती उपस्थिती

यावेळी शास्त्री भक्ती किशोरदासजी, शास्त्री अनंतप्रकाश, पूजारी राममनोहर दासजी, कन्हैया दासजी महाराज, विश्वहिंदू परिषद जिल्हा मंत्री योगेश भंगाळे, बजरंग दल जिल्हा संयोजक विक्की भिडे, तालुका संयोजक लोकेश कोल्हे, नरेंद्र नारखेडे, अनिरुद्ध सरोदे, नितीन राणे यांच्यासह भरत महाजन, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहेते, सरचिटणीस संजय सराफ, जितेंद्र भारंबे, नरेंद्र चौधरी, जयश्री चौधरी, दीपाली झोपे, माजी नगरसेवक संजय रल, प्रा.जी.के.महाजन, दीपक पाटील, दीपक कापडे, हर्षल महाजन, युवराज किरंगे, निरज झोपे, रीतेश चौधरी, किरण चौधरी, संदीप भारंबे, राजेश महाजन, दीपक होले, भाजपाचे ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष पिंटू तेली, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष वैभव वकारे व रामा होले, अक्षय परदेशी, जितेंद्र वर्मा, चंद्रकांत भिरुड, मनोज चौधरी, ईश्वर रल, विनोद परदेशी, गुड्डू हिरे यासह हिंदूवादी संघटनांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!