रावेर पंचायत समितीतील (Raver Panchayat Samiti) वैयक्तिक शौचालय अनुदान घोटाळ्याप्रकरणी (ABDO) रावेर पंचायत समितीची प्रभारी सहायक गटविकास अधिकारी दीपक बाबुराव संदानशिव ( रा. चोपडा) व निवृत्त विस्तार अधिकारी दिनकर हिरामण सोनवणे (रा. वरणगाव ता.भुसावळ) यांना शुक्रवार रोजी रात्रीच्या सुमारास रावेर पोलिसांकडून (Raver Police) अटक करण्यात आली.[ads id="ads1"]
सर्वदूर बहुचर्चित असलेल्या रावेर पंचायत समितीतील (Raver Panchayat Samiti) दीड कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात अटक झालेल्यांची संख्या आता १२ वर पोहचली असून या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार समाधान गोंडू निंभोरे व रावेर पंचायत समितीचे सहायक लेखा सहायक लक्ष्मण दयाराम पाटील यांची शुक्रवारी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक (Jalgaon S P) डॉ.प्रविण मुंढे यांनी स्वतः चौकशी केली.[ads id="ads2"]
तर दुसरीकडे निंभोरासीम येथील ग्रामसेवक कांतीलाल कोळी याची गेल्या दोन दिवसांपासून रावेर पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.अजून खूपच आरोपी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात असून बहुतेक जन पोलिसांच्या रडारवर आहेत



