ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
ऐनपुर ग्रामपंचायत कार्यालयात प्रहार दिव्यांग समिती व ऐनपुर सरपंच व सदस्य यांच्यात अपंगांच्या निधी वाटपासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.[ads id="ads2"]
सविस्तर वृत्त असे की आज दिनांक २०/७/२०२२/ बुधवार रोजी ऐनपूर ग्राम पंचायत मध्ये अपंग बांधव यांच्या करता पाच टक्के निधी मिळावा यांच्या संदर्भात मिटिंग घेण्यात आली या कार्यक्रमात सरपंच अमोल महाजन यांनी सांगितले की आज पर्यंत चोवीस अपंग बांधवांना निधी वाटाप करण्यात आला आहे व राहिलेल्या अपंग बांधवांना लवकर मिटिंग घेऊन निधी वाटप करण्यात येणार आहे असे सरपंच अमोल महाजन यांनी सांगितले.[ads id="ads1"]
या कार्यक्रमात उपस्थित असलेले सरपंच अमोल महाजन ग्राम विकास अधिकारी एस एन गोसावी अप्पा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उप अध्यक्ष जितेद्र कोळी ऐनपुर शाखेचे सचिव हसन शेख ,जिवन अवसरमल, निलेश अवसरमल ,विश्वनाथ भिल, भिकारी हसन शेख, अफजल पिंजारी, योगेश महाजन, संजय मावळे, सुरेश अवसरमल, गणेश पाटील, रविंद्र कोळी, लताबाई सोनार, गणेश शामू, चंद्रकांत अवसरमल ,या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात अपंग बांधव उपस्थित होते